Friday, November 20, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Pune- गेल्या 24 तासात कोरोनाचे 168 नवीन रुग्ण तर 188 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे: शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजाराच्या जवळपास आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 168 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 188रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात  आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 90 हजार 742 इतके कोरोना बाधित रुग्ण  आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 79 हजार 874इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 15 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 10 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8858 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 2010 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 200 रुग्ण गंभीर आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6101 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणेमहापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply