fbpx
Sunday, May 19, 2024
Latest NewsNATIONALPUNETOP NEWS

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पहिले ‘नमो मंदिर’ पुण्यात 

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) माननारा एक मोठा वर्ग भारतात आहे. अशाच एका मोदी भक्ताने चक्क मोदी यांचे मंदिरच (Modi Temple) उभारले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी मोदींचे हे मंदिर पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. मोदी भक्त असलेल्या मयूर मुंढे या भाजप कार्यकर्त्याने पंतप्रधान मोदींना दैवत मानून त्यांचे मंदिर उभारले आहे.

पुण्यातील औंध परिसरात मयूर मुंढे यांनी स्वतःच्या मालकीच्या जागेत हे मंदिर उभारले आहे. यासाठी पिंपरी चिंचवड येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांनी खास जयपूरमधून मोदींचा पुतळा तयार करुन घेतला आहे. याकरिता 1 लाख 60 हजार रुपये खर्च आलेला आहे. रविवारी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिना दिवशी औंधमधील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे.

मंदिरासमोर मयूर मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता मोदी भक्तांकरिता लावण्यात आली आहे. मंदिराबाहेर असलेल्या, फलकावर आतापर्यंत मोदींनी केलेल्या कामाचा उल्लेख देखील या कवितेच्या आधारे मांडण्यात आला आहे. या मंदिरावरून मला विरोधकांनी ट्रोल केलं तरी चालेल, पण मोदींकडून आपल्याला प्रेरणा मिळते. त्यामुळे हे मंदीर उभारले असल्याचे मयूर मुंढेनी सांगितले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading