fbpx
Sunday, May 19, 2024
Latest NewsPUNE

पुणे महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पुरग्रस्तांसाठी २ कोटीं १ लाख रुपयांचा निधी

पुणे : महाराष्ट्रातील विविध भागात महापुराने नुकसान झालेल्या भागासाठी आर्थिक मदत म्हणून पुणे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे २ कोटी १ लाख रुपयांचा धनादेश मा. महापौर मुरलीधर मोहोळ याच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी आमदार भीमराव तापकीर, आमदार माधुरी मिसाळ, उपमहापौर सुनीताताई वाडेकर, विभागीय आयुक्त सौरभ राव , महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) ज्ञानेश्वर मोळक , शहर अभियंता प्रशांत वाघमारे, उपायुक्त (सामान्य प्रशासन) सुनील इंदलकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीमती उल्का कळसकर, मुख्य कामगार कल्याण अधिकारी शिवाजी दौंडकर, पीएमसी एम्प्लॉईज युनियन चे अध्यक्ष प्रदीप महाडिक, आशिष चव्हाण, अजय उमांदे, गोपाळ चव्हाण इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading