Friday, November 20, 2026
Latest NewsPUNE

वृक्षारोपण करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया; स्वातंत्र्य दिनी दलित पँथर ऑफ इंडियाचा संदेश

पुणे: देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दलित पँथर ऑफ इंडिया, पंचशील युवा संघ पुणे, दिव्यरत्न प्रतिष्ठान पुणे, पॅसिफिक फिटनेस क्लब पुणे, यांच्या तर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले. झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा असा संदेश देत गुजरवाडी तेकडी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच लॉकडाऊन व शाळा बंद असल्याने घरात कोंडल्या गेलेल्या मुलांसाठी जादूचे प्रयोग, विविध खेळाचे आयोजन देखील करण्यात आले होते.

इलियास शेख यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या स्वातंत्र्य दिनच्या आंनद उत्साहात प्रमुख उपस्थिती म्हणून बापूसाहेब भोसले (संस्थापक, दलित पँथर ऑफ इंडिया) निलेश आल्हाट (कार्याध्यक्ष,आर.पी.आय A युवक आघाडी पश्चिम महाराष्ट्र), संजू वाघमारे (संस्थापक, गनिमीकावा युवा सेवा संघ), इलियास शेख (प्रदेश कार्याध्यक्ष,दलित पँथर ऑफ इंडिया), रवींद्र गायकवाड (उपसरपंच खरीव गाव वेल्हा), वैनतेय मोरे (संस्थापक, पॅसिफिक फिटनेस क्लब), प्रवीण जोशी (अध्यक्ष,पॅसिफिक फिटनेस क्लब),सागर भालेराव (दिव्यरत्न प्रतिष्ठान) सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब साबळे, आनंद सरवदे, अनिकेत गायकवाड, शाहरुख पठाण, परवेझ शेख, मेहबूब मणियार,जावेद शेख,इकबाल सैय्यद,शाकिर शेख, मेजर जहिरभाई, शशिकांत नाईक, दिव्यरत्न प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बापूसाहेब भोसले म्हणाले, भारत आपल्या सर्वांचा देश आहे. येथे हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी आदी सर्व जाती धर्मातील नागरिकांना समान अधिकार व कायदा या देशाच्या संविधानाने दिला असून आपआपसात वाद न करता आपल्या सर्वाची माता ही भारत माता आहे हे विसरता कामा नये. आजच्या कार्यक्रमा इलियासभाई यांनी लहान मुलांना आमंत्रित करून त्यांना देशभक्तीचे संस्कार देण्याचे दायित्व आपल्या मोठ्यांवर सोपवलेले आहे. आणि याच संस्कारातून आपला देश जगाचा महागुरू बनण्याच्या दिशेने वाटचाल करेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्‍या भावनेतून प्रत्‍येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्‍यासाठी आपापल्‍या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन यावेळी इलियास शेख त्यांनी केले.

Leave a Reply