Friday, November 20, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकाराचा प्रेयसीने केला खून

पिंपरी : लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराचा प्रेयसीने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी प्रेयसीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी २९ वर्षीय प्रेयसीला अटक करण्यात आली आहे. मयत व्यक्तीच्या पत्नीने याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही घटना चिंचवड येथील व्हाईट हाऊस लॉज येथे घडली आहे. पैगंबर गुलाब मुजावर असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो विवाहित असल्याची माहिती समोर येत आहे. मुजावर हा ३५ वर्षांचा होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुजावर आणि २९ वर्षीय तरुणी हे दोघे एकाच ठिकाणी काम करत होते. दोघांची चांगली मैत्री होती. मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात बदलले.

मुजावर हा विवाहित होता, तर २९ वर्षीय तरुणी मुजावरच्या प्रेमात आंधळी झाली होती. ही तरुणी मुजावरसोबत विवाह करण्यास उत्सुक होती. मात्र, विवाह करण्यास मुजावरने नकार दिला. यावरूनच दोघांमध्ये खटके उडाले त्यांच्यात वाद झाले.

दरम्यान, प्रेयसीने मुजावरला चिंचवडमधील व्हाइट हाऊस लॉजवरील ३०७ क्रमांकाच्या रूममध्ये भेटण्यासाठी बोलावले. सायंकाळी सहाच्या सुमारास दोघांची भेट झाली. त्यांच्यात वाद झाले.

वादादरम्यान मुजावरने लग्नास नकार दिल्याचा रागातून प्रेयसीने ओढणीने त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर या तरुणीनेच मुजावर हा बेशुद्ध पडला आहे अशी माहिती तेथील कामगारांना दिली.

तातडीने मुजावरला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी प्रेयसीला पिंपरी पोलिसांनी अटक केलीय.

Leave a Reply