कोरोना – पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 258 नवीन रुग्ण
पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची संख्या अधिक असून आज दोनशेच्यावर रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 258 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 249रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 90 हजार 228 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 79हजार 257इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 14 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 8 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8843जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 2128 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
त्यापैकी 201 रुग्ण गंभीर आहेत
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 9371 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
