Sunday, September 27, 2026
Latest NewsPUNE

चांदणी चौकातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांची प्रत्यक्ष पाहणी

पुणे : चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या कामाने वेग घेतला असतानाच तेथे वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे.पुण्यात कोथरूड मार्गे प्रवेश करणारे वाहन चालक जसे त्रस्त झाले आहेत तसेच महामार्गांवरून सातारा व सोलापूर कडे जाणारे वाहनचालक ही कोंडी, अपघात व खराब रस्त्यामुळे गाड्या नादुरुस्त होणे ह्याला त्रासले आहेत.या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी सर्व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी दौरा आयोजित केला होता.

यावेळी वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, नगरसेवक किरण दगडे पाटील, नगरसेविका अल्पना वर्पे, पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, वाहतूक पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे,वाहतूक पो नि बापू शिंदे, मनपाचे रणदिवे, भुसंपादनचे राजेंद्र थोरात,क्षेत्रीय अधिकारी सचिन तामखेडे,पथ विभागाचे शिर्के,स्वप्नील खोत एन सी सी चे धंनजय वडेर उपस्थित होते.ह्या वेळी चंद्रकांत पाटील यांनी सर्व अडचणी समजून घेतल्या व सर्व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेऊन त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना सुचविल्या व येत्या 8 दिवसात युद्धपातळीवर कोंडी सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याबाबत अधिकाऱ्यांना बजावले.

प्रमुख उपाययोजना…
1) सर्व खड्डे तातडीने बुजविणे व विशेष सॉल्युशन चा वापर करून सदर काम करणे.
2) चांदणी चौकातून पुण्यात ( कोथरूड मार्गे ) प्रवेश करतानाच्या मार्गांवरील पत्रे तसेच मुळशी वरून चांदणी चौकात येताना रस्त्यावर असलेले पत्रे थोडे मागे सरकावून अतिरिक्त लेन तयार करणे, जेणेकरून वाहतूक सुकर होईल.
3) सर्व्हिस रस्ते डागडुजी करून त्वरित सुरु करणे.
4) 25 ट्रॅफिक वार्डन ची त्वरित नियुक्ती करणे.
5) दुर्दैवाने अपघात झाल्यास किंवा एखादे वाहन नादुरुस्त झाल्यास कायमस्वरूपी टोईंग व्हॅन ची व्यवस्था करणे.
6) रस्त्यावरील पसरलेली खडी उचलणे.
7) पुणे मनपा सोबत समन्वय साधून जागा ताबा हा विषय त्वरित मार्गी लावणे व त्यायोगे सर्व्हिस रस्ते व अन्य मार्ग प्रशस्त करणे.
यासह विविध छोटे मोठे विषय त्वरित पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. पुढील आठवड्यात या विषयीचा पाठपुरावा करण्यात येईल असेही आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading