Pune – गेल्या 24 तासात कोरोनाचे 226 नवीन रुग्ण तर 254 रुग्णांना डिस्चार्ज
पुणे: शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे.आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या तीनशेच्या आत आलीआहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पण कमी होत आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 226नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 254रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 89हजार 277 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख78 हजार373इतके रुग्ण बरे झाले आहेत, पुण्यात गेल्या 24 तासात 17रुग्णांचा मृत्यू झाला आहे,यामध्ये शहरातील7तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 10रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8823जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 2051अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
यामध्ये 203रुग्ण गंभीर आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7620 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत.
