‘ज्ञापुं’ च्या विचारांचा आम्ही चालवू पुढे वारसा विविध संघटनांचा संकल्प
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा रोमांच आणणारा इतिहास डोळ््यांसमोर उभा करणारे… ऐकणाºयाच्या मनात तो इतिहास खोलवर रुजविणारे आणि तो इतिहास प्रत्यक्ष जगायला शिकवणारे शिवव्याख्याते स्व. ज्ञानेश पुरंदरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यातील वेगवेगळ््या संघटनांनी एकत्रित येत त्यांना आगळीवेगळी श्रध्दांजली अर्पण केली. ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमातून यापुढे विविध उपक्रम राबवून ज्ञानेश पुरंदरे उर्फ ज्ञापुंच्या विचारांचा वारसा आम्ही पुढे देखील चालवू असा संकल्प विविध संघटनांनी संकल्प सभेत केला.
राजे शिवराय प्रतिष्ठान व परिवाराच्यावतीने सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर सभागृहात स्व. ज्ञानेश पुरंदरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी रा.स्व.संघाचे महेश करपे, मिलींद एकबोटे, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, महेश पुरंदरे, स्व-रूपवर्धिनेचे रामभाऊ डिंबळे , किशोर चव्हाण, पराग ठाकूर, सौरभ करडे, दिग्पाल लांजेकर, राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे, रणजित टेमघरे, विक्रम बर्गे, शिवाजी खरात आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर पुण्यातील विविध संघटनांचे प्रमुख उपस्थित होते.
महेश करपे म्हणाले, कार्यकर्ता कसा घडवायचा, तो कसा असावा आणि तो कसा जपावा हे ज्ञापुंच्या संपर्कात राहून समजले. विविध संघटनांना एकत्र करून कोरोना सारख्या कठीण प्रसंगात देखील ते किती तत्परतेने कार्य करीत होते ते मी पाहिले आहे. मातृत्व संपन्न अशा ज्ञापुंना श्रध्दांजली वाहण्यासाठी पुणे शहरात हिंदूत्ववादी संघटनांना एकत्र करून त्यांना समग्र केले पाहिजे. तसेच छोट्या संघटना देशासाठी, हिंदुत्वासाठी कार्य करणाºया संघटनांना एकत्र आणण्याचा संकल्पही त्यांनी केला.
मिलिंद एकबोटे म्हणाले, तत्वाने जिवंत राहणारी व्यक्ती म्हणजे ज्ञापु. त्यांची भूमिका आणि विचारसरणी ही नेहमी सकारात्मक होती. त्यांना श्रध्दांजली म्हणून पुण्यातील हिंदुत्वावादी संघटनांची लढावू फळी निर्माण करू. तसेच छत्रपतींचा इतिहास हा प्रत्येकाच्या मनात रुजावा याकरीता शिवचरित्राचे अभ्यास वर्ग सुरू करण्याचा संकल्प त्यांनी केला. मोहन शेटे म्हणाले, क्रांतिकारकांचे स्मरण करीत त्यांचा इतिहास पुढे आणत त्यांना आदरांजली वाहत विविध तरुण व्यक्त्यांना पुढे आणण्याचा संकल्प करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
पराग ठाकूर म्हणाले, समाजातील सामाजिक कार्य करणाºया व्यक्ती नेहमीच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अशा कार्यकर्त्यांच्या आरोग्य तपासणी करीत ज्ञापुंना आदरांजली वाहण्याचा संकल्प करू. महेश पवळे म्हणाले, ज्ञापुंचे फक्त स्मरण न करता त्यांचा परिस्पर्श लाभलेल्या संघटनांना एकत्र करीत लव्ह जिहाद नष्ट करणाºयाच प्रयत्न करू. तसेच पुण्यातील छोट्या मोठ्या सर्व हिंदूत्ववादी संघटनांना एकत्र आणित त्यांच्यामध्ये समन्वय निर्माण करण्याचा संकल्प त्यांना केला.
