Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

2024 च्या निवडणुकीत पण भाजप सिंगल इंजिनवरच येणार – देवेंद्र फडणवीस

पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठी चालू आहेत. सगळीकडे चर्चा मनसे आणि भाजप युतीची चर्चा चालू आहे. त्या वर आज देवेंद्र फडणीस यांनी भाष्य केले .ज्या प्रकारे मेट्रोला एकच इंजिन असते. मेट्रोला  डबल इंजिनची आवश्यकता नाही, तसंच आम्ही 2024 च्या निवडणुकीत पण आम्ही सिंगल इंजिनवरच येणार आहोत’, असं म्हणत फडणवीस यांनी युतीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

गेल्या काही दिवसांपासून नवी दिल्लीत भेटीगाठीचे सत्र घडल्यामुळे राज्यातील राजकारणात नव्याने भाजप आणि शिवसेना युतीची चर्चा रंगली आहे. पण, 2024 च्या निवडणुकीत आम्ही एकाच इंजिनवरच येणार आहोत, असं महत्त्वाचं विधान भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे मेट्रो मार्गाची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला असता फडणवीस यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.
तसंच, देशाला पुढं नेण्यासाठी चांगल्या कंडक्टरची गरज आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावर फडणवीस म्हणाले की, ‘हा उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव आहे, टिप्पणी का कमेंट आहे, हे बघावे लागेल.’
आज उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या पक्षाने कशा शुभेच्छा द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे, पण नवीन पिढीला शुभेच्छा दिल्या पाहिजे. परंपरेने नेतृत्त्व पुढं येत असेल तर त्यांनी अनुभव घेतला पाहिजे’, असा सल्ला फडणवीस यांनी तेजस ठाकरे यांना दिला.
मी मुख्यमंत्री असताना आणि पंतप्रधान मोदींनी भूमिपूजन केलेली पुणे मेट्रो प्रगती पथावर आहे याचं मोठं समाधान आहे. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading