Tokyo Olympic 2020 -21 : भारताला पहिले ‘गोल्ड’, नीरज चोप्राचा भाला ठरला ‘सोनेरी’
टोकियो : टोकिया ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympics 2020-21) आजचा (7 ऑगस्ट) शेवटचा दिवस हा भारतासाठी सोनेरी ठरला आहे. भालाफेकमध्ये नीरज चोप्राने सुवर्ण पदकाची कमाई केली. अन् अखेरच्या दिवशी अब्जावधी भारतीयांचे गोल्ड मेडलच स्वप्न पूर्ण झाले. आजवरच्या ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक गटात भारताला मिळालेले हे दुसरे सुवर्ण पदक आहे. यापूर्वी नेमाबाजित 2008 साली अभिनव बिंद्राने ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्ण पदक पटकावले आहे. 23 वर्षीय नीरजने पहिल्याच प्रयत्नात 87.58 मीटर भाला फेकला. भारताची टोकियो ऑलिम्पिकची सुरुवात सिल्व्हर मेडलने आणि अखेर गोल्ड मेडलने झाली आहे.
हरियाणा सरकारकडून 6 कोटींचे बक्षिस जाहीर
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नीरज चोप्रा याचं अभिनंदन केलं आहे. हरियाणा सरकारच्या वतीनने 6 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केले आहे. नीरज चोप्राची इच्छा असल्यास त्याला क्लास वन दर्जाची नोकरी देऊ, अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे.
History has been scripted at Tokyo! What @Neeraj_chopra1 has achieved today will be remembered forever. The young Neeraj has done exceptionally well. He played with remarkable passion and showed unparalleled grit. Congratulations to him for winning the Gold. #Tokyo2020 https://t.co/2NcGgJvfMS
— Narendra Modi (@narendramodi) August 7, 2021
Indian eyes are gleaming with gold! 🤩🇮🇳
For the first time in the country's history, they have an Olympic gold medallist in #athletics. 🥇
Congratulations, Neeraj Chopra. The #Tokyo2020 men's javelin Olympic Champion. 👏#Athlete365 #StrongerTogether #Javelin pic.twitter.com/AkMQtDNTSq
— Athlete365 (@Athlete365) August 7, 2021
