Wednesday, June 17, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

Tokyo Olympic 2020 -21 : जय बजरंग बली! पैलवान बजरंग पुनियाला कुस्तीत कांस्य पदक

टोकियो:  भारताचा पैलवान बजरंग पुनियाने कझाकिस्तानच्या डॉलेट नियाझबेकोला हरवून कांस्य पदक आपल्या नावावर केले. 65 किलो वजनी गटात कांस्यपदकाची लढाईत पुनियाने सुरूवाती पासूनच आपली आगेकूच कायम ठेवली. अखेर मॅच 8-0 अशी जिंकत बाजरंगने भारताला कांस्य पदक मिळवून दिले आहे.

भारताच्या 25 वर्षीय पैलवान बजरंग पुनियाची आज कझाकिस्तानच्या डॉलेट नियाझबेको पैलवानाशी कांस्यपदकाशी लढत झाली. बजरंग पुनिया या मॅचमध्ये पहिल्यापासून सकारात्मक खेळ करताना दिसून आला. पहिल्या राऊंडमध्ये बजरंग पुनियाला 2-0  अशी आघाडी मिळाली होती.  प्रतिस्पर्धी खेळाडू  सुरुवातीपासून नकारात्मक खेळ करताना दिसून आला. बजरंग पुनियानं दुसऱ्या राऊंडमध्ये लागोपाठ 6  गुण मिळवतं आघाडी भक्कम केली आणि त्याचे विजयामध्ये रुपातंर झाले. त्यामुळे सामना हा एकतर्फी झाला अन् बजरंग पुनियाने 8 – 0 असा सामना जिंकला.

दरम्यान, बजरंग पुनियाने कांस्य पदक मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading