Wednesday, November 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

BIG NEWS – राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार – वर्षा गायकवाड

मुंबई : “राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा राज्याच्या शिक्षण विभागाचा विचार आहे. येत्या 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा विचार करत आहोत. त्याबाबत निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे. तसेच नियम शिथील केलेले आहेत, अशा ठिकाणी आम्ही ग्रामीण भागात पाचवी ते आठवी वर्गाच्या शाळा सुरु करण्याचा विचार करत आहेत. तसेच शहरी भागात आठवी ते बारावी वर्गाच्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा आमचा मानस आहे. येणाऱ्या 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा आमचा विचार आहे,” अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. त्या मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या.

तसेच 1 ऑगस्टला ब्रेक द चेनअंतर्गत नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. मागील वर्षाच्या मार्च 2020 पासून राज्यातील सर्व शाळा कोरोनामुळे बंद आहेत. त्यामुळे आता लवकरच शाळा सुरू करण्याच्या शिक्षण विभागाच्या हालचाली सुरु आहेत. असेही गायकवाड म्हणाल्या.

दरम्यान, राज्य सरकारने राज्यातील सर्व खासगी शाळांचे शुल्क 15 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार याबाबत गायकवाड यांनी भाष्य केलं. 15 टक्के फी कमी करण्याचा निर्णय झालेला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांकडून आदेश आल्यावर त्याची अंमलबजावणी होईल, असे गायकवाड यांनी सांगितलं.

Leave a Reply