Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

भीमाशंकरची श्रावणी यात्रा कोरोनामुळे यंदाही रद्द

पुणे : भारतातील बारा ज्योतिर्लीगापैंकी एक असलेल्या पुण्याच्या खेड तालुक्यातील श्री. क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावणात होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याही वर्षी रद्द करण्यात आली आहे. तरी पाच पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. खबरदारी म्हणून डिंभा व पालखेवाडी येथे पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन घोडेगावचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी केले आहे.

राज्य सरकारने कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय अजूनही कायम ठेवला आहे.त्यामुळेच भीमाशंकरची श्रावण महिन्यात होणारी यात्रा यंदाही रद्द केली आहे.सध्या भीमाशंकरकडे भाविक व पर्यटक जाऊ नयेत यासाठी पालखेवाडी चेकपोस्ट, डिंभे नाका याठिकाणी चोविस तास कर्मचारी नेमले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading