Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

Pune – नव्याने समाविष्ट गावात कचरा उचलण्यासाठी पैश्याची मागणी

पुणे :  पुणे महानगरपालिकेने नुकतेच २३ गावांचा समावेश महापालिकेत केलेला आहे. या २३ गावांचा समावेश झाला खरा परंतु पायाभूत सुविधांसाठी या गावाची  अडवणूक केली जात आहे.तेथील समस्यांची दखल कोणी हि घेत नाही असे दिसून आले आहे.म्हणून या समाविष्ट गावातील  नऱ्हे येथील लोकांनी आयुक्तांकडे दाद मागितली आहे.

नऱ्हे गावातील कचरा उचलण्यावरून नागरीकांना कोणती ही माहिती न देता कचरा उचलण्याचे पैसे  न दिल्यास उद्या पासून कचरा उचला जाणार नाही अश्या धमक्या दिल्या जातात.धमक्या देणाऱ्या एजन्सी  मार्फत कोणते हि कागदपत्रे दाखवले जात नाहीत.काही सोसायटी मधून कचरा वाहून नेण्याचे बंद केले आहे आणि पैसे दिल्यानंतरच कचरा वाहून नेण्याचे काम केले जाईल असे धमकावले जाते.

नऱ्हे गावात पूर्वी पासून कचरा उचलण्यासाठी त्या त्या सोसायटी /अपार्टमेंट लोकांची नेमणूक केलेली आहे.त्यांच्या मार्फत तो कचरा गोळा करून कचरा गाडीत टाकला जातो.हे अनेक वर्षे चालू आहे.या जुन्या पद्धती बंद करणे संयुक्तिक नाही.विशेष म्हणजे महापालिकेत समावेश होऊन अजून १ महिना सुद्धा पूर्ण झालेला नाही.या स्वयाघोषित एजेन्सी मुळे  डबल पैसे देण्याची वेळ नागरिकां वर आलेली आहे.त्यामुळे आम्ही सर्व नागरिक हतबल झाले  आहेत.नागरिकाची लुट सुरु आहे. नऱ्हे गावातील ओयासीस ,समृद्धी सोसायटी ,जी के सोसायटी , विलोचन रेसिडन्सी आदी सोसायटी मधील नागरिकांनि आयुक्ताकडे तक्रार केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading