यो. यो. हनी सिंग विरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल
मुंबई : प्रसिद्ध रॅपर आणि गायक यो. यो. हनी सिंगच्या विरोधात त्याची पत्नी शालिनी तलवार हीने घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच 10 कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे. या आरोप पत्रात शालिनीने हनी सिंगचे इतर महिलांशी शारीरीक संबंध आहेत, तसेच सांसाऱ्याकडून आपला विनयभंग झाल्याचा आरोपही केला आहे. शालिनीचे म्हणणे आहे की, तिला प्राण्यासारखे वागवले गेले आहे. ज्यामुळे तिने हे मोठे पाऊल उचलले आहे. शालिनीने तिचे संपूर्ण प्रकरण नवी दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाच्या मुख्य महानगर दंडाधिकारी तानिया सिंह यांच्यासमोर दाखल केले आहे. यावर हनी सिंगला 28 ऑगस्टपर्यंत उत्तर द्यायचे आहे.

10 वर्षांचा संसार
हनी सिंगने 23 जानेवारी 2011 रोजी शालिनी तलवारसोबत लग्न केले होते. झी न्यूजच्या बातमीनुसार, हनी सिंगची पत्नी सांगते की, गेल्या 10 वर्षांपासून तिला घरात वाईट रीतीने वागवले जात होते. जिथे तिच्यावर शारीरिक, शाब्दिक, मानसिक आणि भावनिक अत्याचार झाले आहेत. हनी सिंहने त्यांच्या लग्नाला महत्त्व दिले नाही, त्याने त्याच्या लग्नाची अंगठीही घातली नव्हती. एकदा जेव्हा शालिनीने तिचे आणि तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यानंतरही तो खूप रागावला आणि त्याने शालिनीला बेदम मारहाण केली होती. शालिनी सांगते की हनीचेही अनेक अफेअर्स होते, जिथे त्याने “ब्राऊन रंग साँग”च्या शूटिंग दरम्यानही त्याच्याच टीममधील एका मुलीसोबत सेक्स केला होता.
मुख्य महानगर दंडाधिकारी तानिया सिंह यांनी नोटीस जारी केली आहे की, हनी सिंहने पती-पत्नीमध्ये असलेल्या कोणत्याही मालमत्तेमध्ये कोणत्याही पक्षाला जोडू नये, त्याच्या पत्नीचे सर्व दागिने तिला देण्यात यावेत. शालिनीने कोर्टातही अपील केले आहे की, हनीला दर महिन्याला दिल्लीतील एका आलिशान फ्लॅटच्या भाड्यासाठी 5 लाख रुपये द्यावे लागेल. कारण, तिला स्वतःच्या आईबरोबर राहायचे नाही. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, हनी सिंग मूल होत नसल्याने डीप्रेशनमध्ये होता.
