Tokyo Olympics 2020-21 : पैलवान रवी कुमार दहियाला कुस्तीत रौप्यपदक
Tokyo Olympics 2020-21 : टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत गुरुवारी पैलवान रवी कुमार दहियाने रौप्य पदकाला गवसणी घातली. कुस्तीत ररवी कुमार दहियाने पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो गटात रौप्यपदक जिंकले आहे. रवि कुमार दहियाचा सामना रशियाचा पैलवाना जवुर यूगेव सोबत होता. रौप्य पदक जिंकल्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दहियाला चार कोटी रुपयाचे बक्षिस जाहीर केले आहे. तर सामन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील पैलवान रवी कुमार दहियाचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, कुस्तीमध्ये हे भारताने दुसरे रौप्य पदक जिंकले आहे. या अगोदर सुशील कुमारने भारताला 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवून दिले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये हे भारताचे दुसरे रौप्य पदक आहे. या अगोदर मीराबाई चानूने देशाला रौप्य पदक दिले आहे. टोकियो ऑल्मिपिक 2020 मध्ये भारताने आतापर्यंत दोन रौप्य पदके जिंकली आहे.
Ravi Kumar Dahiya is a remarkable wrestler! His fighting spirit and tenacity are outstanding. Congratulations to him for winning the Silver Medal at #Tokyo2020. India takes great pride in his accomplishments.
— Narendra Modi (@narendramodi) August 5, 2021
Another medal for @WeAreTeamIndia!
Kumar Ravi of #IND takes #silver in the men's freestyle 57kg #Wrestling#StrongerTogether | @Tokyo2020 | @Wrestling pic.twitter.com/7bNZ4jdfya
— Olympics (@Olympics) August 5, 2021
