Wednesday, November 18, 2026
ENTERTAINMENTLatest News

Happy Birthday जेनेलीया, रितेश देशमुखची Special पोस्ट

बॉलीवूडमधील सर्वाधिक कयूट कपल म्हणून रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोजा या जोडीकडे पाहिले जाते.  आज जेनेलियाचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त जेनेलियाचा पती रितेशने आपल्या ‘बायको’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत ट्विटरवर एक पोस्ट शेयर केली आहे. यामध्ये ‘तुमसे मिलके एसा लगा तुमसे मिलके …’, या गाण्यावर त्या दोघांनी मिळून शूट केलेल्या रील्सचा एकत्रित एक व्हिडिओ शेयर केला आहे. तर फेसबूक आणि इंस्टाग्रामवर रितेशने जेनेलियाचे सेल्फ मेड डिजिटल आर्ट पोस्ट केले आहेत.

जेनेलियाही 15 वर्षांची होती तेव्हा तिने एका जाहिरातीमध्ये काम केले होते. या जाहिरातीत तिला बिग बी अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली. अन् खऱ्या अर्थाने तिचा इंडस्ट्रीतील प्रवास सुरू झाला.

जेनेलियाला अभिनयाबरोबरच फुटबॉलची देखील आवड आहे. कॉलेजमध्ये असताना तिने राष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळला आहे.

दरम्यान, जेनेलियाने आणि रितेशने 2003 मधील ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटामध्ये पहिल्यांदा एकत्र काम केले. जेनेलियाने या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

 

या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान रितेश आणि जेनेलियामध्ये मैत्री झाली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तब्बल 10 वर्षांच्या डेटिंग नंतर 2012 साली रितेश आणि जेनेलियाने लग्नगाठ बांधली.

आज यांना रियान आणि राहील नावाची दोन मुलं आहेत.

 

 

Leave a Reply