fbpx
Saturday, April 20, 2024
BusinessLatest News

सेफेक्सप्रेस – नवी मुंबई येथे आधुनिक लॉजिस्टीक पार्क सुरु

मुंबई : भारतातील प्रमुख पुरवठा सप्लाय चेन आणि लॉजिस्टीक कंपनी सेफेक्सप्रेसने नवी मुंबई येथे आपले ६२ वे आधुनिक लॉजिस्टीक पार्क सुरु केले आहे. हा महत्त्वाकांक्षी आणि क्षमतेने परिपूर्ण असणारा प्रकल्प नियोजनबद्ध पद्धतीने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाजवळ निर्माण केला आहे. सेफ एक्सप्रेस लॉजिस्टिक पार्क नवी मुंबई १.६० लाख स्क्वेअर फिट क्षेत्रफळावर स्थित आहे.

या लॉजिस्टिक पार्क मध्ये ट्रान्सशिपमेंट आणि ३पीएल सुविधा उपलब्ध आहेत. शिवाय  सदर लॉजिस्टिक पार्क हा एकाच वेळी ५० वाहनांचे लोडिंग आणि अनलोडिंग करण्यासाठी सक्षम असेल,  ज्यामुळे औद्योगिक मालाचा पुरवठा आणि त्याचे दळणवळण सुयोग्यरितीने आणि कोणताही अडथळ्याविना करता येईल. लॉजिस्टिक पार्क हे अत्यंत उच्च पद्धतीने नियोजित करण्यात येईल,  त्यामुळे नवी मुंबई येथून भारतातील कोणत्याही ठिकाणी मालाचे दळणवळण जलद गतीने करता येईल. लॉजिस्टिक पार्कमध्ये आग विरोधी उपकरणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ असेल जे कोणत्याही आपत्तीमध्ये या सुविधेचे रक्षण करण्यासाठी नेहमी सुसज्ज असतील.

अनेक उद्योगांचे माहेरघर असलेल्या महाराष्ट्रातील नवी मुंबई हे पुरवठा शृंखला (सप्लाय चेन) आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी एक महत्त्वाचे स्थान बनले आहे. ही बाब लक्षात घेता,  सेफेक्सप्रेस यांनी आपले लॉजिस्टिक पार्क नवी मुंबई येथे उभारले आहे.  ही सुविधा निसर्गनिर्मित आणि तंत्रज्ञान या दोघांचा संगम आहे. सेफ एक्सप्रेस यांनी लॉजिस्टिक पार्क उभारताना रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा कार्यान्वित केली आहे, आणि हरित झोन निर्माण केला आहे,  दिवसाच्या वेळी सूर्यप्रकाशाचा उपयोग करून ऊर्जेचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.  

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading