Saturday, September 26, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONAL

CBSE 10th result : सीबीएसई दहावीचा निकाल ९९.४ टक्के

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा (सीबीएसई) दहावीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये एकूण विद्यार्थ्यंपैकी ९९.४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीबीएसई दहावीचा यंदाचा निकाल हा आतापर्यंतच्या सर्वोत्तम निकाल म्हणून घोषित करण्यात आला आहे. कारण जवळपास सर्वच विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

सीबीएसईच्या दहावी परीक्षेसाठी 21,13,767 विद्यार्थ्यांनी 10 वीच्या नोंदणी केली होती. यापैकी 20,97,128 विद्यार्थ्यांचा  निकाल तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर 16,639 विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 20 लाख 76 हजार997 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या परीक्षेत एकूण 99.04 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्रिवेंद्रम शहरानं सीबीएसईच्या निकालात बाजी मारली आहे. त्रिवेंद्रम विभागाचा निकाल 99.99 टक्के लागला आहे.  विभागनिहाय पाहिलं असता त्रिवेंद्रम विभाग सीबीएसई 10 वीच्या निकालांमध्ये अव्वल आहे. त्यानंतर बेंगळुरू, चेन्नई, पुणे, अजमेर, पटना, भुवनेश्वर, भोपाळ, छत्तीसगड, देहरादून, प्रयागराज, नोएडा, दिल्ली पश्चिम, दिल्ली पूर्व आणि गुवाहाटी असा क्रम आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading