Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसमवेत साजरा झाला ‘मैत्री दिन’

पुणे : कोरोनाच्या कठीण काळात डॉक्टरांनी जीवाची पर्वा न करता रुग्णांवर उपचार केले. किट नसताना रेनकोट चा वापर करत १८ ते २० तास सातत्याने उपचार केले. यातच ८ ते १० महिने स्वतःच्या परिवाराला डॉक्टर आणि कर्मचारी यांना भेटता आले नाही . त्यांच्या या कार्याला अभिवादन करण्यासाठी पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूलच्यावतीने के .ई.एम हॉस्पिटल पुणे येथे त्यांना मैत्रीचा धागा बांधून मैत्री दिन साजरा करण्यात आला.

यावेळी प्रशासकीय अधिकारी स्मिता कुलकर्णी, सविता बिडकर, अपूर्वा तांबोळकर, रेखा भांगे आणि राखी व्यास आदी उपस्थित होते. के .ई.एम हॉस्पिटल पुणे येथील डॉ.प्रदीप डिकोस्टा आणि मलिका अय्यर तसेच यांचा स्टाफ या कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाला अभिवादन करून हा मैत्री दिवस साजरा करण्यात आला.

मल्लिका अय्यर यांनी गरजू,पेशंटला अन्नाची सोय करून दिली तर परमजित सिंग यांनी रुग्णांसाठी फळे आदींची सोय केली. तसेच रक्त आणि प्लाज्मा कमी पडत असताना डॉ. शर्मा यांचेही योगदान मोलाचे ठरले. त्यामुळे अशा खा-या कोरोना वॉरियर्स सोबत मैत्री दिन साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading