दिव्यांग मुलांनी लुटला आषाढी एकादशीचा आनंद

पुणे : विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला, असं म्हणत सावली या दिव्यांग मतिमंद मुलांच्या संस्थेनी आषाढी एकादशीचा आनंद लुटला. त्यांनी पालखीत विठूमाऊलीला सजवून तिची दिंडी काढली. दिव्यांग मुलांना विठ्ठल-रखुमाई, वारकरी अशा पोशाखात सजवून त्याचे रुप सजविले. यावेळी सेविकांनी सावली संस्थेत फुगडया खेळून मुलांना एक वेगळ्याच आनंदात सामावून घेतले.

पालखीतल्या विठ्ठलाची आरती करुन त्या विठठ्लासमोर हा कोरोना जाऊ दे, पुढचं वर्ष सुखाचं येऊ दे म्हणत प्रार्थना केली. यावेळी मुलांनी हातात झेंडे घेऊन ठेका धरला. त्यांना ठेका धरावसर्वसामान्य म्हणून तरी ही मुलं आपलं आयुष्य व्यतित करत नसली, तरीही त्यांना आनंद साजरा करण्याचा आधिकार आहे. त्यामुळे अशा विविध उपक्रमातून आम्ही त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करत असल्याचं सावली संस्थेचे संस्थापक वसंत ठकार यांनी सांगितलं. तर प्रमुख रेक्टर अनिता टापरे यांनी सांगितलं की, या मुलांना बोल नाही, भाषा नाही. त्यामुळे त्यांना खास प्रकारे शिकवून अशा प्रकारचे उपक्रम त्यांच्या तब्येतीत सुधारणा करतात. त्यांना आनंद देतात. त्यांच्या आनंदात मिसळून जाणं, हेच आमच्यासाठी खूप मोलाचं असतं. सावली संस्थेत असे अनेक प्रकारचे उपक्रम केले जातात, जेणेकरुन दिव्यांग मुलांना आनंदाची प्रचिती यावी, हेच सावलीचे सार असल्याचंही वसंत ठकार यांनी सांगितलं.

Leave a Reply

%d bloggers like this: