‘डॉ.कलाम यंग रिसर्च फेलोशिप ‘ चे वितरण २७ जुलै रोजी

पुणे : पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या ‘तेर पॉलिसी सेंटर’तर्फे देण्यात येणाऱ्या ‘डॉ.एपीजे अब्दुल कलाम यंग रिसर्च फेलोशिप 2020-21’ चा वितरण समारंभ २७ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन होणार आहे.

‘तेर पॉलिसी सेंटर’च्या संस्थापक डॉ. विनिता आपटे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. या फेलोशिपचे हे तिसरे वर्ष आहे. देशातील ७ तरुण संशोधकांना ही फेलोशिप देऊन गौरविण्यात येणार आहे.कायनेटिक ग्रुपचे चेअरमन अरुण फिरोदिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशोक मंगोत्रा, डॉ. सतीश कुलकर्णी, अनील अरोरा हे फेलोशिप प्रोग्रॅमचे ज्युरी देखील उपस्थित राहणार आहेत.

पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या तरुण संशोधकांना ही फेलोशिप देऊन गौरविण्यात येते. या योजनेचे हे तिसरे वर्ष आहे. या वर्षी १५०० अर्ज प्राप्त झाले होते. यातून निवडलेल्या ५ जणांना प्रत्येकी २५ हजार रुपये, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय ज्युरींनी निवडलेल्या अन्य दोन संशोधकांना १० हजार रुपये , प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: