fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

बकरी ईदनिमित्त पुण्यात नमाज पठणचे ‘फेसबुक लाईव्ह’ प्रसारण

पुणे: कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज पठण करू नये या आवाहनाचे पालन करीत पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीत बकरी ईद नमाजचे ‘फेसबुक लाईव्ह’ द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले.बकरी ईदच्या नमाज मधून ‘कोरोना मुक्ती ‘ आणि देशाच्या सुख शांतीची दुआ मागण्यात आली

२१ जुलै रोजी सकाळी ८ वाजता हा उपक्रम करण्यात आला.मुस्लिम बांधवांनी घरातुन या नमाज पठणात सहभागी व्हावे ,असे आवाहन आझम कॅम्पस शैक्षणिक,सामाजिक परिवाराचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांनी केले होते.

मशिदीच्या पेश इमाम यांच्या मार्गदर्शना खाली घरी नमाज पठण करणे नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने शक्य झाले असून २९ मे २०२० पासून हा उपक्रम दर शुक्रवारी सुरु आहे.या तंत्रामुळे मशिदीत गर्दी होत नाही,फक्त पेश इमाम मशिदीतून नमाज पठण करतात आणि इतरांना घरातून त्यात सहभागी होणे शक्य होते.दर शुक्रवारी दुपारी दीड वाजता हा उपक्रम होतो.

बकरी ईद दिवशी देखील आझम कॅम्पस मशिदीमध्ये पेश इमाम शराफत अली ,नसीम अहमद यांनी नमाज पठण केले तर आझम कॅम्पस च्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमीन शेख यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.

एरवी शहराच्या विविध भागात मशिदींमध्ये शुक्रवार (जुम्मा) दिवशी सामूहिक नमाज पठण केले जाते.कोरोना संसर्गचा धोका लक्षात घेऊन शुक्रवारी मशिदीत जाता येत नाही. त्या सर्वांना या फेसबुक लाईव्ह नमाज पठणाचा लाभ होत आहे.आझम कॅम्पस या फेसबुक पेज वर हे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येते.प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांनुसार सोशल डिस्टन्स चे नियम पाळण्यात येतात. पुढील लिंक द्वारे या नमाज पठणात दर शुक्रवारी सहभागी होता येते. https://www.facebook.com/azamcampus1922

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading