धर्माने विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलविला – डॉ. रामचंद्र देखणे

पुणे : धर्माने विज्ञानाकडे पाहण्याची दृष्टी बदलविला. पण ही दृष्टी परिवर्तन करण्यासाठी संत साहित्याचे खूप मोठी योगदान आहे. ज्या दिवशी संत साहित्याकडे पाहण्याचा आमचा दृष्टीकोण बदलेल त्यावेळेस तत्वज्ञ संतांना धार्मिक कोणी ठरविले याचे उत्तर मिळेल, असे विचार संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषदे’ च्या तिसर्‍या दिवशी ‘आमच्या तत्वज्ञ संतांना धार्मिक कोणी ठरविले? ’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संतसाहित्याचे अभ्यासक ह.भ.प. श्री तुकाराम महाराज गरुड ठाकुरबुवा दैठणेकर होते. यावेळी हरिद्वार येथील परमपूज्य अनंतश्री विभूषित महामंडलेश्वर श्री श्री १००८ ईश्वरानंद ब्रह्मचारी श्री उत्तमस्वामीजी महाराज, पं. वसंत गाडगीळ, डॉ. सदानंद मोरे, डॉ. विजयकुमार फड आणि ह.भ.प. संजय महाराज धोंडगे एमआयटी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, कुलसचिव डॉ. प्रशांत दवे ,डॉ. संजय उपाध्ये हे उपस्थित होते.

डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, धार्मिक हा सांप्रदायीक शब्द आहे. संत साहित्यात धर्म हा शब्द आलेला आहे .परंतू ते कालानुरूप वेगवेगळ्या अर्थाने त्यांना मांडण्यात आले आहे. पाश्चात्यात धर्म शब्द तेवढा रूढ नाही.आपल्याकडे धर्म हा सांप्रदायिक झाला. नियम, कर्तव्य, आचार हे धर्माचे खरे तत्व त्यालाच वैश्विक धर्म असे ही म्हणू शकतो. 

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, पाश्चात्यांमध्ये वेगवेगळ्या धर्मामध्ये तत्वज्ञानाचा अधिक प्रभाव दिसतो. या देशात वेदाला धर्म मानायचे का नाही एक प्रश्न आहे. गीतेमध्ये धर्माला वेगवेगळ्या अर्थाने मांडल्या गेले आहे. त्यात सर्वोत्कृष्ट धर्म म्हणजे परमात्माचे रक्षण करणे.

तुकाराम महाराज गरूड ठाकुरबुवा म्हणाले, धर्म हा शब्द कर्तव्य प्रदान आहे. आज मानवाने जी वैज्ञानिक प्रगती केली आहे ती विनाशाकडे घेऊन जाणारी आहे. त्याने मानवी मनाचे अधपतन केले आहे. मणुष्यामध्ये जेव्हा विकार वाढतातेव्हा त्यावर नियंत्रण कसे मिळवावे हे गीता शिकविते. 

डॉ. विजयकुमार फड म्हणाले, ज्यामध्ये धारण असून प्रजेचे खरे रक्षण होते तोच खरा धर्म होय.  आज समाजाला धार्मिक या शब्दाचा अर्थ कळला नाही म्हणूनच वाद निर्माण झाले आहेत. धार्मिक शब्द हा उपहासात्मक पध्दतीने वापरला गेला आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: