Monday, June 22, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

डॉ. अमोल कोल्हे हाच लबाड कोल्हा आढळराव यांची टीका

पुणे : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी अमोल कोल्हेंच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. ‘जाहीर कार्यक्रमात थेट मुख्यमंत्र्यांना खासदार कोल्हेंनी काल लक्ष केलं होतं.

कोल्हेंनी स्वत:ची लायकी पाहून वक्तव्य करावं. हाच लबाड कोल्हा शिवसेनेतूनच मोठा झाला आणि आता त्याच शिवसेनेवरच बोलायचे हा या माणसातील गुणधर्म आहे का? असा सवाल आढळराव पाटील यांनी थेट कोल्हेंना विचारला.’राजकारणात खालच्या पातळीवर जाऊन तरुण आणि म्हतारे असं समीकरण जोडून लोकांची दिशाभूल केली जातेय.

मी म्हातारा जरी असतो तरी माझ्याकडे बुद्धीमता, समज आहे, यांच्यासारखा नटसम्राटासारखं नाही’ असं म्हणत आढळरावांनी कोल्हेंना टोला लगावला.’मी खासदार असताना लोकसभेत भांडून 2018 ला माझ्या पाठपुराव्यामुळेच या महामार्गाच्या कामाचा पाठपुरावा केला. मार्च 2019 ला भूमिपूजन केलं. माझं श्रेय असताना मला डावललं जात आहे. आता मी खासदार नाही ठीक आहे.

पण मला उद्घाटनाला किमान फोन तरी करायला हवा होता. मुख्यमंत्री यांचा फोटो तरी जाहिरातीत वापरायला पाहिजे होता. पुणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त बिघाडी इथले राष्ट्रवादीचे नेते,अमोल कोल्हे, दिलीप मोहिते करतात, असा आरोपही पाटील यांनी केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading