बकरी ईद ची जय्यत तयारी


पुणे: बकरी ईद हा मुस्लिम समाजात साजरा केला जाणारा पवित्र सण . हा सण साजरा करण्यासाठी मुस्लिम समाजातील प्रत्येक घरात तयारी सुरु आहे. त्यासाठी बिबवेवाडीतील येथील अप्पर परिसरात छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची दुकाने सजली आहेत. कोरोनाच्या सावटामुळे बकरी ईद एकत्र येऊन साजरा करता येणार नसल्यामुळे पारंपारिक पद्धतीने घरी साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. 

.त्यासाठी घराघरातून नागरिक दुकानात जाऊन खरेदी करताना दिसत आहेत व्यवसायिकांनी त्यासाठी फळे कपडे शेवई मेंदी, बांगड्या, मिठाई यांची रस्त्यावर हंगामी विक्रीची दुकाने थाटली आहेत.  कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा सण साध्या पद्धतीने साजरा होणार आहे.
त्यामुळे ग्राहकाकडून मागणीवर परिणाम झाला आहे सणामध्ये चांगला व्यवसाय होत असतो पण यंदाही कोरोनामुळे त्यामध्ये मोठी घट झाली असल्याचे कपडे विक्रेते असलम शेख, रफिक शेख यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: