लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील वारजे माळवाडी उत्तमनगर परिसरात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून प्रशांत रायकर (वय 25) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मुलीसोबत हा प्रकार फेब्रुवारी 2020 ते 2021 या कालावधीत घडला आहे.

पीडित मुलीसोबत ओळख झाल्यानंतर आरोपी प्रशांतने तिच्याशी प्रेमाचे नाटक केले आणि यानंतर पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. तर तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून मुलगी गर्भवती राहिली होती. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणीने पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास उत्तमनगर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: