कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी – पृथ्वीराज चव्हाण

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री अकार्यक्षम होते तर मग त्यांना सात वर्षे पदावर मोदीनी का ठेवले? कोरोना काळातील स्वतःचे अपयश झाकण्यासाठी मंत्रिमंडळातील चेहरे बदलून काहीही होणार नाही. तर पंतप्रधान मोदींनाच बदलण्याची गरज आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, कॉँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी माजी आमदार मोहन जोशी, नगरसेवक अभय छाजेड उपस्थित होते.

महागाईबाबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,  कोरोना महामारी मुळे उद्योग धंदे बंद होऊन कोट्यावधी लोक बेरोजगार झाले. खाण्यापिण्याच्या मूलभूत गोष्टी एवढ्या महाग झाल्या आहेत की सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. अर्थव्यवस्थेत सगळं आलबेल असेल तर सामान्य लोकांवर पेट्रोल-डिझेलच्या कराचा बोजा का टाकला जात आहे? जीएसटी आल्यापासून केंद्राचा राज्यांच्या कराचा वाटा वेळेवर देत नाही जीएसटीचा वाटा वेळवर मिळत नसल्याने देशभरातील सर्वच राज्य सरकारांना पेट्रोल डिझेल वरील वॅट आणि दारू विक्रीतून मिळणारे उत्पादन शुल्क यावर अवलंबून राहावे लागत आहे. पेट्रोलने शंभरी पार केली आहे तेलाचे भाव 70 ते 75 डॉलर प्रति बॅरेल असून  केवळ केंद्र सरकारने वाढविल्या करामुळे सामान्य जनतेवर हलाखीची परिस्थिती झाली आहे.

पुढे चव्हाण म्हणाले, कोरोना काळात देशाची अर्थव्यवस्था मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे रसातळाला गेली आहे . चुकीच्या गोष्टींवरून  दुसरी कडे लक्ष वेधण्यासाठी हिंदुत्व, काश्मीर प्रश्न, लव जिहाद कायदा या गोष्टी पुढे करून लोकांची दिशाभूल केली जात आहे. मनमोहन सिंग सरकारच्या काळात 14 टक्के लोकांना दरिद्रय रेषेतून बाहेर काढले होते मात्र मोदी सरकारच्या काळात 23 कोटी लोक दारिद्र्य   रेषेखालील ढकलले गेले आहेत. 

Leave a Reply

%d bloggers like this: