अण्णा भाऊ साठेंच्या स्मृतिदिनाची प्रथा महापौरांनी मोडली झोपडपट्टी सुरक्षा दलाने नोंदवला निषेध

पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन होता . प्रथेनुसार पुण्यनगरीच्या महापौरांनी सकाळी सगळ्यात आधी येऊन अण्णा भाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर बाकीच्या संघटनांनी पुष्पहार अर्पण करण्याची दरवर्षीची प्रथा आहे . पण यंदा महापौर पुतळ्याच्या ठिकाणी कमालीच्या विलंबाने आले . त्यामुळे बाकीच्या संघटनांना तिथे सुमारे चार तास तिष्टत रहावे लागले . यामुळे उपस्थितांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या . झाल्या प्रकाराचा धिक्कार केला . महापौरांनी अक्षम्य विलंब करून एक प्रकारे स्व . अण्णा भाऊंचा अपमानच केला आहे . असा आरोप झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक भगवानराव वैराट यांनी केला आहे .

संघटनेच्या वतीने ही पुतळा स्थळी महापौरांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या . असे प्रकार व दिरंगाई यापुढे सहन केली जाणार नाही असा इशाराही यावेळी संघटनेतर्फे महापौरांना देण्यात आला . यावेळी संघटनेचे पदाधिकारी दत्ता कांबळे , प्रदीप पवार , गणेश लांडगे , सुरेखा भालेराव , महंमद शेख , अर्चना वाघमारे , वंदना पवार , टिना शेखर , महादेव मोरे , सुर्यकांत संपकाळ , सोमनाथ सायरे , वैशाली अवघडे , नानासाहेब गोरे , संतोष सोनवणे , रमेश दोरगे , धिरज कांबळे , लक्ष्मण बिराजदार आदि उपस्थित होते . घटनास्थळी निर्माण झालेल्या तणावाची स्थिती भगवानराव वैराट यांनी संयमाने हाताळत कार्यकर्त्यांना शांत केले .

Leave a Reply

%d bloggers like this: