Big News – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांची दिल्लीत भेट

नवी दिल्ली :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ‘शरद पवार’ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्लीत भेट झाली आहे. या दोन्ही नेत्यांची जवळपास तासभर चर्चा असून, ही चर्चा नेमकी कोणत्या मुद्द्यांवर झाली या विषयी अद्याप निश्चित माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, यावेळी केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि राजनाथ सिंह यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी पीएमओमध्ये गेले.

गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडी सरकार अस्थिर असल्याची चर्चा विरोधकांकडून केली जात आहे. आणि याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर आज शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: