Saturday, September 5, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

11 वी प्रवेशासाठी CET परीक्षेची ऑनलाईन नोंदणी 19 जुलैपासून

पुणे : महाराष्ट्र राज्य मंडळाचा दहावीचा निकाल ( SSC Result) लागला. आता 11 वी सामायिक प्रवेश परीक्षांची (CET) तारीख बोर्डाकडून जाहीर करण्यात आली असून अकरावी प्रवेशासाठी CET परीक्षेची ऑनलाईन नोंदणी येत्या 19 जुलै पासून सुरु होणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे.

राज्य मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर परीक्षेचा अर्ज उपलब्ध आहे. अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा ही OMR उत्तरपत्रिकांद्वारे घेण्यात येणार असून ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. सीईटी परीक्षा ही राज्य मंडळामार्फत घेण्यात येणार आहे. सीईटी परीक्षांचे अर्ज राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य असतील. तर इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना यासाठी शुल्क आकारण्यात येईल अशी माहिती दिनकर पाटील यांनी दिली.

अशी करा ऑनलाइन नोंदणी

राज्य मंडळाच्या अधिकृत वेबसाइट वर जा.
विद्यार्थ्यांचा दहावीचा आसन क्रमांक टाकून सीईटी परीक्षेचा अर्ज भरता येईल.
तिथे दहावीच्या निकालाचे गुण अपडेट केलेले असतील.
त्यानंतर पुढे तुमच्यासमोर परीक्षेसाठी इच्छुक आहात का? किंवा नाही असे दोन पर्याय समोर येतील. योग्य पर्याय निवडून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा.

असे आहे सीईटी परीक्षांचे स्वरुप

सीईटी परीक्षा या अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येतात. मात्र ही वैकल्पिक म्हणजेच पर्यायी परीक्षा आहे. यात विचारले जाणारे प्रश्न हे दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात. ही परीक्षा OMR पद्धतीची असते. एकूण १०० गुणांच्या परीक्षेत बहुपर्यायी पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. परीक्षा देण्यासाठी २ तासांचा कालावधी देण्यात येतो. CET परीक्षांमध्ये मिळणाऱ्या गुणांच्या आधारे अकरावी प्रवेश प्रक्रियेला प्राध्यान्य देण्यात येते. त्याचप्रमाणे CET परीक्षांच्या गुणांच्या आधारे कॉलेजमध्ये प्रवेश दिला जातो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading