Saturday, September 5, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

Crime – फळांच्या खाली लपवून आणलेला तब्बल पावणे चार कोटींचा गांजा पकडला

पुणे: फळांच्या खाली लपवून आणलेला तब्बल 1 हजार 878 किलो गांजा पुणे पोलिसांनी जप्त केला. या गांजाची किंमत सुमारे पावणे चार कोटी रूपये आहे.

या प्रकरणी पुणे पोलिसांनी राजू गोंधवे, श्रीनिवास पवार, विलास पवार, धर्मराज शिंदे, अभिषेक घावटे आणि विनोद राठोड या सहा जणांना अटक केली आहे. पुणे-सोलापूर रोडवरून अननस आणि जॅक फ्रूटची वाहतूक करणार्‍या ट्रकमध्ये 1 हजार 878 किलो गांजा पकडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर रोडवरून टीएस 07 यूएए 7979 या क्रमांकाचा आयशर ट्रक जात होता. या ट्रकमध्ये अननस आणि जॅक फ्रूट होते. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये फळांचे 40 बॉक्स आढळले.

त्या बॉक्सच्या खाली गांजाच्या पिशव्या आढळून आल्या. त्यामध्ये 1 हजार 878 किलो गांजा होता. त्याची 3 कोटी 75 लाख रुपये इतकी किंमत होत असल्याचे सांगण्यात आले. तर या प्रकरणी सहा आरोपींना ताब्यात घेतल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

त्यांनी आंध्रप्रदेशातून गांजा आणल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी अनेक जणांचा सहभाग असण्याची शक्यता असून त्यांचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading