Sunday, June 21, 2026
Latest NewsMAHARASHTRA

राज्यात शनिवारी ८ हजार नवीन कोरोना रुग्ण

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार १७२ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून ८ हजार ९५० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर, राज्यात आज १२४ बाधितांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५९ लाख ७४ हजार ५९४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.२८ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ५२ लाख ६० हजार ४६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख ०५ हजार १९० (१३.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,७७,६१५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,१५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,००,४२९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

कोरोना लसींचे दोन डोस घेतल्यामुळे मृत्यूदर कमी झाल्याचं आयसीएमआरच्या अभ्यासातून समोर आहे. ९५ टक्के मृत्यू रोखण्यात लसींचे दोन डोस यशस्वी ठरले आहेत. तर एक डोस घेणाऱ्या लोकांच्या मृत्यूदरात ८२ टक्के घट झाल्याचं दिसून आलं. कोरोनाकाळात आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना लसींचे दोन डोस देण्यात आले होते. त्यामुळे सर्वात घातक अशा डेल्टा व्हेरिएंटपासून त्यांचं संरक्षण झालं, अशी माहिती निती आयोग सदस्य डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading