फरसाण फुकट दिलं नाही म्हणून एका फौजदारानं दुकानातील कामगाराला बेदम मारहाण
मुंबई: फरसाण फुकट दिलं नाही म्हणून एका फौजदारानं दुकानातील कामगाराला बेदम मारहाण केल्याची घटना घडलीये. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होतोय. मुंबईतील मुलुंडच्या इंद्रप्रस्थ भागात ही घटना घडली.
फरसाण फुकट दिलं नाही म्हणून एका फौजदारानं दुकानातील कामगाराला बेदम मारहाण केल्याची घटना घडलीये. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होतोय. मुंबईतील मुलुंडच्या इंद्रप्रस्थ भागात रविवारी सायंकाळी ही घटना घडली.
फुकटात फरसाण दिलं नाही म्हणून मुलुंड ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील यांनी दुकानातील कामगार प्रकाश चौधरी याला बेदम मारहाण केल्याचा आरोप सुनील चौधरी या दुकानमालकानं केलाय. सुनील चौधरी यांनी याबाबत परिमंडळ 7 चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्याकडे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केलाय. या तक्रार अर्जात म्हटल्यानुसार, काही दिवसांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील यांनी साडेचार हजार रुपयाचं फरसाण आपल्याकडे फुकटात मागितलं होतं मात्र ते फरसाण मी त्यांना फुकटात न दिल्याचा राग मनात ठेवून त्यांनी विकेंड लॉकडाउनचं कारण काढलं आणि रविवारी संध्याकाळच्या सुमारास दुकान अर्धवट उघडं असताना ते दुकानात दाखल झाले. त्यांनी कामगाराला दुकान का उघडं ठेवलंय, असे विचारत मारहाण केली शिवाय त्यानंतर थेट पोलीस ठाण्यात नेऊन त्या ठिकाणीही देखील बेदम मारलं. या घटनेत कामगाराच्या कानाला दुखापत झालीये. दरम्यान, या घडलेल्या प्रकाराबाबत माहिती देण्यास मुलुंड पोलिसांनी मात्र टाळाटळ केली.
