‘कोविड पश्चात काळातील शिक्षण’ विषयावरील परिषदेला प्रतिसाद

पुणे : कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी तर्फे ११ जुलै रोजी ‘कोविड पश्चात काळातील शिक्षण’ विषयावरील परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद हॉटेल रॅडिसन (गुरुग्राम ,दिल्ली ) येथे झाली. डॉ रिपुरंजन सिन्हा यांनी’कोविड पश्चात काळातील उच्च शिक्षण’या विषयावर मार्गदर्शन केले.डॉ. प्रियदर्शिनी नायक यांनी ‘कोविड पश्चात काळातील शालेय शिक्षण’या विषयावर मार्गदर्शन केले.

कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक राकेश मित्तल यांनी ‘किंगडम ऑफ टोंगामधील संशोधनाच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ योगेश चंदना (इव्हॅल्युएशन कमिशनर ऑफ इंटरनॅशनल ऍक्रिडिटेशन ऑर्गनायझेशन),साफी अख्तर (प्रशासकीय सचिव,ऑल इंडिया मिली कौन्सिल), अजयकुमार वाजपेयी (टाटा मोटर्स ), डॉ. प्रियदर्शिनी नायक ( सीईडी फाऊंडेशन ), डॉ. अबेद अल जफर ( पॅलेस्टाईन ) हे मान्यवर या परिषदेत उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: