पानशेत पूरग्रस्त वास्तू हक्कासाठी आजही आम्ही पाठपुरावा करत आहोत – अश्विनी कदम
पुणे: पुनवडीपासून आजच्या आधुनिक पुणे शहराच्या बदलत्या स्वरूपाचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या, “सहकारनगर ह्या आमच्या प्रभागात शेकडो पूरग्रस्तांचे पुनर्वसन झालेले आहे. पण आज ६० वर्षांनंतरही काही पूरग्रस्तांचे प्रश्न सुटलेले नाहीत. प्रशासकीय पातळीवर पानशेत पूरग्रस्त वास्तू हक्कासाठी आजही आम्ही पाठपुरावा करत आहोत. ह्या पुस्तकाच्या निमित्ताने ह्या प्रलंबित विषयाला वाचा फुटली असून हा प्रश्न लवकर सुटण्याची आशा निर्माण झालेली आहे.” असे अश्विनी कदम यांनी केली.
१२ जुलै, २०२१, पुणे- पानशेत धरणफुटीला आज ६० वर्षे झाली. त्याच दिवशी “१२जुलै, १९६१” ह्या शीर्षकाच्या- पानशेत धरणफुटीच्या पार्श्वभूमीवरच्या कादंबरीचे प्रकाशन आज पुण्यात झाले.
ज्येष्ठ संपादक, लेखक विजय कुवळेकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. आळेकरांनी पाठवलेल्या संदेशात ते म्हणाले, “ही कादंबरी वाचताना मला गो. नी . दांडेकरांच्या “आम्ही भगिरथाचे पुत्र ” या पंजाबच्या भाक्रा नांगल धरणाच्या उभारणीवर लिहिलेल्या कादंबरीची आठवण आली. आम्ही भगिरथाची पुत्र ही एका प्रचंड मोठ्या धरणाच्या उभारणीची अत्यंत वाचनीय कहाणी आहे.”
लेखिका आश्लेषा महाजन म्हणाल्या, “पानशेत प्रलयाविषयी माहितीपूर्ण पुस्तके व अहवाल आहेत. ललित अंगाने फारसे लेखन नाही. म्हणून ह्या घटनेला मध्यवर्ती ठेवून मी कथानकाचा गोफ विणला आहे. हे मातीचे धरण का व कसे फुटले? त्यात भ्रष्टाचार वा राजकारण होते का? तत्कालीन मुख्यमंत्री यशवंराव चव्हाणांनी ही युद्धजन्य परिस्थिती कशी हाताळली? पूरग्रस्तांचे पुनर्वसन कसे झाले? ह्या प्रश्नांसह आपत्तीमध्ये माणूस, समाज कसा वागतो? मनातल्या भावनिक आंदोलनांचे तो काय करतो? संकटकाळी मानवी वृत्तींचे कसे भला-बुरे दर्शन घडते? हे सारे कादंबरीत चित्रित केले आहे.”
कुवळेकर म्हणाले, “कादंबरीमध्ये आजच्या काळातील तरुण मुले हा शोध घेतात, ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते. आर्किटेक्ट असलेली शैली, तिचा प्रियकर- चित्ततोष, पर्यावरण अभ्यासक- ऋतुपर्ण ह्या दुर्घटनेचा रोचक पद्धतीने माग काढतात. कादंबरीतील इतर पात्रे, उपकथा घटनांचे पदर उलगडत जातात. लेखिका कुठलेही नैतिकतेचे धडे देत नाही, कुठलेही तत्त्वज्ञान सांगत नाही. तत्कालीन वातावरण चित्रित करण्यासाठी ‘अभिरूप न्यायालय’ हे प्रकरण लेखिकेने कल्पकतेने लिहिले आहे. ६० वर्षांतला बदलता काळही नायिका शैली, नायक चित्ततोष, तसेच ऋतुपर्ण, सुदर्शन, वसंतआजोबा ह्या पात्रांच्या माध्यमातून रोचक पद्धतीने वाचकांसमोर साकारतो.
