पुरुषोत्तम फिल्म प्रोडक्शन निर्मित वेबसिरीजचा मुहूर्त संपन्न
पुरुषोत्तम फिल्म प्रोडक्शन आर्ट निर्मित प्रशांत पाटील व पद्माकर नष्टे दिग्दर्शित हिंदी वेबसिरीज चा मुहूर्त वैशाली तावरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सचिन तावरे व वेब सेरीज मधील सर्व कलाकार उपस्थित होते. या नवीन हिंदी वेब सिरीज चा मुहूर्त मोठ्या उत्साहात डोनजे येथे पार पडला.
ही वेबसीरिज हिंदी असून लवकरच OTT प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होणार आहे. ही वेबसिरीज धमाल कॉमेडी वेबसीरिज असून यामध्ये अनेक नवोदित कलाकारांचा समावेश असुन ही वेबसरिज तरुणाईवर आधारीत आहे. यांचे लेखन पद्माकर नष्टे यांनी केले असून या वेबसिरीजचे छायाचित्रण अजय घाडगे हे करीत आहेत. तर सह दिग्दर्शक हिमांगी काकडे व सुरज वामन प्रोडक्शन हेड कल्याणी पाटील करीत आहेत. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहरचे उपाध्यक्ष पवन राजे बंबूळगे, विनोद दादा गायकवाड आदी उपस्थित होते.
