पहिली भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषद १५ जुलै पासून
पुणे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती, आळंदी देवाची, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषद’ गुरूवार, दि. १५ जुलै २०२१ ते रविवार, दि. १८ जुलै २०२१ या कालावधीत ऑनलाइन आयोजित करण्यात आली आहे.
एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल वि. कराड यांची संकल्पना आणि पुढाकारातून ही पहिली भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषद संपन्न होत आहे.
या परिषदेचा उद्घाटन समारंभ गुरूवार दि. १५ जुलै २०२१ रोजी दुपारी २ वा. होणार आहे. यासाठी नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री, हे प्रमुख पाहुणे म्हणून प्रस्तावित असून, विष्णू कोकजे, माजी राज्यपाल, हिमाचल प्रदेश व ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक व ज्येष्ठ कीर्तंनकार व प्रवचनकार ह.भ.प.श्री किसन महाराज साखरे, हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष व तत्त्वज्ञ प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे ‘आमचे संत तत्वज्ञ नव्हते का?’ या विषयावर बीजभाषण देणार आहेत.
समारोप सत्र रविवार, दि. १८ जुलै २०२१ रोजी दुपारी ४.३० वा. होईल. या समारंभासाठी सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून मोहन भागवत, सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे प्रस्तावित असून, संगणक तज्ञ, पद्मभूषण डॉ. विजय भटकर, आयसीसीआरचे चेअरमन, राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा कराड हे सन्माननीय अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.

नोंदणीसाठी www,santsahityashikshan.org या संकेतस्थळाला भेट द्यावी
अशी माहिती श्री क्षेत्र देहू संस्थानचे माजी अध्यक्ष, तत्त्वज्ञ संत श्री तुकाराम महाराज यांचे वंशज आणि पहिल्या भारतीय संत साहित्य उच्चशिक्षण परिषदेच्या संयोजन समितीचे कार्याध्यक्ष ह.भ.प.श्री. रविदास महाराज शिरसाठ, समन्वयक डॉ. संजय उपाध्ये व डॉ. महेश थोरवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.