Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कोरोना – राज्यात शनिवारी ८ हजार २९६ नवीन रुग्ण

मुंबई : राज्यात २४ तासांत ८ हजार २९६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १७९ मृत्यूची नोंद झाली आहे. तर शनिवारी ६ हजार ०२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, राज्यात आजपर्यंत एकूण ५९ लाख ६ हजार ४६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९६.०५ टक्क्यांवर गेला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख ०६ हजार ४६६ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण १ लाख १४ हजार इतकी आहे. दरम्यान, राज्यात एकूण ४ कोटी ३८ लाख १३९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ६१ लाख ४९ हजार २६४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात ५ लाख ८५ हजार ५८० जण गृह विलगीकरणात आहेत. तर, ४ हजार ७३७ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

तर मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ५०४ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ७३६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत १३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार ६१२ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे ७ हजार ४८४ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.०७ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालावधी ९०९ दिवसांवर गेला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading