पावसाळी अधिवेशनात खासदारांना कोरोना चाचणी बंधनकारक

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या येत्या १९ जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहाचे कामकाज कोविड आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करून एकाच वेळेत चालणार आहे.त्यासाठी खासदार व सर्व संसदीय कर्मचारी यांना संसदेत उपस्थित राहण्यासाठी कोरोना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू व लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी नुकताच अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. या तयारीत कोविड प्रोटोकॉलबाबत माहिती घेण्यात आली. मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर झालेले पावसाळी अधिवेशन अभूतपूर्व बैठक व्यवस्थेसह घेण्यात आले होते. सकाळी ९ पासून राज्यसभेचे व दुपारी ३ पासून लोकसभेचे कामकाज प्रत्येकी चार चार तास चालविण्यात येत होते. दोन्ही सभागृहांत व प्रेक्षक गॅलऱ्यांमध्येही खासदारांची बैठक व्यवस्था होती. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून दोन्ही सभागृहांचे कामकाज पूर्ववत सकाळी ११ ते सायंकाळी ६ अशा एकाच वेळेत घेण्यात आले. तीच पद्धत यावेळीही सुरू राहणार आहे. प्रेक्षकांना यावेळीही संसदेच्या आवारात प्रवेश नसेल.६५० खासदारांनी घेतली लससंसदेच्या दोन्ही सभागृहांमधील ६५० हून खासदारांचे कोरोनाप्रतिबंधक लसीकरण झाल्याचे कळते

Leave a Reply

%d bloggers like this: