fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

अभाविपच्या वतीने ‘परिषद की पाठशाला’- उपक्रम

पुणे: शिक्षार्थ परिषद सेवार्थ परिषद” हे ब्रीदवाक्य घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद , महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने राज्यभर ‘ परिषद की पाठशाला ‘ उपक्रम उत्साहात सुरू आहे. या अंतर्गत पुणे जिल्हा व पुणे महानगरपालिकेच्या   वतीने शहराच्या विविध ठिकाणी व ग्रामीण भागात उपक्रम सुरू असून ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सेवावस्तींवर जाऊन अभाविप कार्यकर्ते गणित , विज्ञान , इतिहास , इंग्रजी सारखे विविध विषय शिकवतात ; प्रसंगी पाठशालेवर चित्रकला व खेळांचे आयोजन देखील केले जाते. शारिरीक शिक्षणाचे महत्व लक्षात घेता योगाभ्यासासमेतच पसायदान , प्रार्थना व श्लोकांचे देखील अध्ययन या पाठशालेत केले जाते. शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. चिंचवडे नगरातील भोलेश्वर मंदीर , काळेवाडी , लांडेवाडी आणि ग्रामीण पुणे जिल्हामध्ये तळेगाव व मुळशी अशा विविध ठिकाणी उपक्रम सुरू आहे. अनेक विद्यार्थी या उपक्रमाच्या निमित्ताने हसतखेळत शिक्षणाचा आनंददायी अनुभव घेत आहेत.
अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आव्हान उपक्रम प्रमुख ऋषीकेश विढोळे व सहप्रमुख ऋत्विक देशपांडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading