VBA – प्रकाश आंबेडकर काही दिवस सक्रिय राजकारणापासून अलिप्त

मुंबई : राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या नेत्यांना कधीही सक्रिय राजकारातून ब्रेक घेता येत नाही. परंतु किमान काही दिवस तरी स्वःत साठी किंवा कुटुंबासाठी वेळ देण्याचा प्रयत्न केला जातो. आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर हे आता तब्बल तीन महिने पक्षात कार्यरत राहणार नसल्याचे समोर येत आहे.

याबाबत त्यांनी स्वतः ट्विटर वर व्हिडीओ टाकून माहिती दिली आहे. मी स्वत: तीन महिने पक्षात कार्यरत राहणार नाही. या काळात कोणत्याही कार्यक्रमात मी सहभागी होणार नाही, असं आंबेडकर म्हणाले आहेत. माझ्या व्यक्तिगत कारणासाठी मी तीन महिने सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. तर, पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत देखील त्यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे.

‘पक्ष चालला पाहिजे. संघटन चाललं पाहिजे. पाच जिल्ह्यात निवडणुका आहेत. त्यासाठी पक्षाला अध्यक्ष हवा. त्यामुळे रेखाताई ठाकूर यांची महाराष्ट्र प्रदेशच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही सर्व रेखाताई ठाकूर यांना सहकार्य कराल आणि पाच जिल्ह्यातील निवडणुकात विजयाच्या दिशेने वाटचाल कराल अशी आशा आहे,’ असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. तर, सध्या त्यांच्या अचानक सुट्टीवर जाण्याच्या निर्णयावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: