fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

चिंताजनक पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 432 नवीन रुग्ण

पुणे: पुणे शहरामध्ये कोरोनाचा  प्रादुर्भाव कमी होत आहे  आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची  संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या तीन हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या अधिक होती. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये  432 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 271 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 80 हजार 582 इतके कोरोना बाधित रुग्ण  आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 69हजार 083 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 14 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 8 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8628 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.पुणे शहरामध्ये सध्या 2871 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 252रुग्ण गंभीर आहेत. . आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7026स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading