राज्यमंत्री बच्चू कडू यांना पॅथर  पुरस्कार जाहीर

पुणे: झुंजार लोकनेते व बंडखोर महाकवी नामदेव ढसाळ यांनी त्यांच्या क्रांतिकारी संकल्पनेतून स्थापन केले लढाऊ संघटना दलित पॅंथर दलितांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी अण्णासाहेब प्रतिकार करणाऱ्या तळागाळातील लोकांच्या निकला दूर करण्याचा वसा घेतला आहे या संघटनेला हे 49 वर्षे  पूर्ण होत आहेत या लोकोत्तर प्रवासाचा सोहळा आपण सर्वांनी नामदेव दादांचे वारसदार म्हणून हा पॅंथर दिन सादर करीत आहोत.
येत्या शुक्रवारी नऊ तारखेला दलित पॅंथर चा वर्धापन दिन घोरपडी मॅरेज हॉल घोरपडी गाव येथे 12 ते 4 या वेळेत हा वर्धापन दिन होणार असून
मलिका नामदेव ढसाळ राष्ट्रीय अध्यक्षा दलित पॅंथर यांच्या हस्ते राज्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू यांना पॅंथर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत यशवंत नडगम अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश दलित पॅंथर यांनी दिली.

यावेळी संतोष गायकवाड युवा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश श्रीकांत लोणारे, केंद्रीय कोषाध्यक्ष सोनाली नवदुगे ,पुणे जिल्हा महिला अध्यक्ष सनी पंजाबी, कार्याध्यक्ष पुणे शहर अर्जुन शिंगे पश्चिम महाराष्ट्र संघटक दलित पॅंथर चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या वर्धापन दिनासाठी पॅंथर व नामदेव ढसाळा वर प्रेम करणारे माजी केंद्रीय गृहमंत्री व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोले, आमदार विश्वजीत दादा कदम, माजी आमदार उल्हास दादा पवार ,रामभाऊ तायडे, नगरसेवक, आरपीआय, व इतर मान्यवर उपस्थित राहणार असूनअशी माहिती संतोष गायकवाड यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: