स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची दशा आणि दिशा
कोरोना महामारी मुळे 2020 मध्ये परीक्षा रद्द झाली आणि सर्व एमपीएससी च्या विद्यार्थ्यांना वाट बघण्याशिवाय काही पर्याय नव्हता पहिला लाट संपली वाटले की आता तरी परीक्षा होईल पण नाही झाली आम्ही विद्यार्थ्यांनी आंदोलन देखील केले परंतु फक्त आश्वासन देण्यात आले त्यानंतर दुसरी लाट आली त्यामध्ये परत आमच्या पदरी निराशा आली पण त्यामध्ये मोर्चे सभा यांना मान्यता मिळाली नाही पण एमपीएससी च्या परीक्षा मात्र घेण्यात आल्या नाहीत कारण सांगितले की महामारी आहे.
सगळ्या लोकप्रतिनिधींकडून राजकारण केले जात आहे सगळे लोक प्रतिनिधी आम्ही स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठा व ओबीसी समाजाला आरक्षण भेटल्यावर खूप विद्यार्थ्यांची भरती केली जाईल असे लोकप्रतिनिधी आश्वासन देत आहे जो तो या परीक्षे बाबत राजकारणी स्वतःला हायलाईट करत आहे, परंतु कोणी फिक्स काही सांगत नाही. अशी व्यथा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या रमण दळवी याने ‘महाराष्ट्र लोकमंच’ कडे व्यथा व्यक्त केली.

स्पर्धा परीक्षा होत नाहीत त्यामुळे कुठले परिणाम होतात ते रमण दळवी या विद्यार्थ्याने सांगितल
मानसिक संतुलन बिघडते आत्महत्या करावीशी वाटते वय वाढते सामाजिक व आर्थिक समस्या येतात वय वाढल्यामुळे लग्न करता येत नाही
दुसरे ऑप्शन नाही आहे इच्छा असून देखील अधिकारी होऊ शकत नाही कारण सहा वर्षात दोन मेंन्स दिल्या आहेत आम्ही कधी अधिकारी होणार, जे मुले व मुली एमपीएससी क्लास वन निवड झालेले आहेत 2019 मधील त्यांचे जॉइनिंग देखील नाही झाले.
बेरोजगारी देखील भरपूर वाढली आहे सर्व विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातील आहे त्यांचे आर्थिक प्रश्न आहेत. शासनाचे धोरण व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याचे परिणाम म्हणून 20 टक्के मुलांनी एमपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सोडला आहे. खूप मुलांची इच्छा नसताना लग्न झाले एमपीएससी च्या परीक्षा लवकर होत नसल्यामुळे खूप विद्यार्थ्यांनी दुसरी काम शोधणे सुरू केले आहे व काही जण काम शोधत आहेत
माझी एमपीसी आयोगाला विनंती आहे या शासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचा हा तिढा सोडवावा.
मागच्या काँग्रेस सरकारच्या काळात रिक्त जागा कमी भरल्या psi ,sti च्या भरती कंत्राटी पद्धतीने केल्या ती कंत्राटी पद्धत रद्द करावी असे आव्हान आयोगाला रमण दळवी यांनी केले आहे
भाजप सरकारच्या काळात जागा जास्त भरल्या नाहीत फक्त गाजर दाखवले, शासन नवीन भरती काढण्याच्या विचारात दिसत नाही आम्हाला नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी पण पैसे नाहीत आम्हा युवकांना सरकारने भरकटले आहे भरकटलेले आहे शासन फक्त कंत्राटी पद्धत भरत आहे.
– शब्दांकन : निखिल पवार (महाराष्ट्र लोकमंच)
