केंद्र सरकारचा ‘सिरम’ विषयी आकस व दूजाभाव का…? – गोपाळदादा तिवारी

पुणे : देशात कोरोना’ची ३री लाट येण्याची शक्यता वर्तावली जात असतांना व त्याचा धोका १७ वर्षा खालील मुलांना असल्याचे सांगितले जात असतांना देश विदेशातील संशोधक कंपन्या मुलांकरीता सक्षम लसींचे ऊत्पादन तयार करण्या मागे आहेत.. याच पैकी भारतातील ‘कोव्हीशिल्ड’ बनवणारी सिरम इन्स्टीट्यूट ही पुणे शहरात आहे..!

१७ वर्षे वयापर्यॅतच्या मुलांवर “कोवोव्हॅक्स लसीच्या २ व ३ ऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या करण्यास सिरम इन्स्टीट्यूट”ला केंद्र सरकारने (सीडीएससीओ च्या समितीने) परवानगी नाकारल्याचे वृत्त नुकतेच आले..
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे राज्यप्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पुन्हा केंद्रावर तोफ डागून “मोदी सरकार कोरोना च्या ३ऱ्या लाटे बाबत व त्याचा प्रभाव पडण्याची जास्त शक्यता असलेल्या ‘मुलांच्या आरोग्या बाबत’ खरोखर गंभीर आहे काय..? असा सवाल विचारून केंद्र सरकार “देश-विदेशात कोरोना संकट काळात तारणहार ठरणारी “कोविशील्ड लसीचे ऊत्पादक सिरम इन्स्टीट्यूट विषयी आकस व दूजाभाव का बाळगून आहे”.? असे देखील आयोजीत पत्रकार परीषदेत विचारले..
एकीकडे ‘ भारत बायोटेक’ व कॅडीला’ला या दोन्ही कंपन्यांना ”लस सुरक्षीत असल्याचा अहवाल न घेताच*” त्यांना चाचण्या करण्यास केंद्र सरकार परवानगी देते(?)…
मात्र (लसीकरणात आधाडीची भूमिका बजावणाऱ्या) *सिरम इंस्टीट्यूट व तिच्या कोव्हॅक्स’ला मात्र चाचण्या घेण्यास (लस सुरक्षीत असल्याचा प्रथम अहवाल देण्याची अट घालून) चाचण्या घेण्यास परवानगी देत नाही(?)…. हा दूजाभाव असून, जर लहान मुलांकरीता लस येण्यास ऊशीर झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकारची राहील, असा ईशारा वजा वक्तव्य देखील त्यांनी या प्रसंगी केले..
एकीकडे कॅडीला (DNA टेक्नॅालॅजीने केलेली पहिलीच वॅक्सीन असूनही) जगात प्रथम वापरली जात आहे.. तरी ही त्यांचे कडून (सुरक्षीत असल्याचा अहवाल न घेतांच) चाचणीस परवानगी हा असैध्दांतीक व अजब न्याय आहे…!
वास्तविकता तर ही आहे की, सिरम इन्स्टीट्यूट च्या “नोव्हॅक्स”ला USA च्या रेग्युलेटर्स ॲथाॅरीटीने अमेरीकेत हीच् चाचणी करण्यास मान्यता देखील दिली व तेथे सु.३००० (१७ वर्षाखालील) मुलांना चाचणी-लस देऊन देखील झाली, असल्याचे गोपाळ तिवारी यांनी यावेळी सांगीतले.. मात्र स्वदेशात मात्र सिरम ला ‘आकस व दूजाभाव’ सोसावा लागत आहे, हे देशाचे दुर्दैव आहे..! याच सिरम च्या कोव्हीशिल्ड च्या यशस्वितेबद्दल मोदी साहेब आत्मनिर्भर च्या नावाखाली श्रेय देखील घेत होते.. हे ते विसरले काय..? असेही त्यांनी विचारले…!
सिरम ची पुर्वी ११ कोटी डोसेस ची ॲार्डर येत्या आठवडा भरात संपत असून, आज अखेर सिरम कडे फक्त २४ कोटी कोव्हीशील्ड डोसेस चीच् ॲार्डर असल्याची आपली माहीती आहे..! डिसेंबर २१ अखेर लसीकरणाचा पल्ला आपण अशा गतीने कसा साध्य करू शकू ही देशवासियांपुढे चिंतेचा विषय आहे, असेही गोपाळ तिवारी यांनी सांगितले..

Leave a Reply

%d bloggers like this: