Pune – गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 269 नवीन रुग्ण, 220 रुग्णांना डिस्चार्ज
पुणे: पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत. परंतु मागील काही दिवसांपासून शहरामध्ये नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. परंतु आज बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 269 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 220रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 79 हजार 072 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 677हजार 25इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 15रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 10 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 5रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8599 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 2748अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 285 रुग्ण गंभीर आहेत. . आज दिवसभरात पुणे शहरातील विविध केंद्रावर 6694 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत आजपर्यंत शहरांमध्ये 26 लाख 81 हजार 143 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
