Pune -कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश रमेश बागवे यांचे पद कोर्टाने केले रद्द! भुपेंद्र शेंडगे यांनी दिली माहिती

पुणे : माजी गृहराज्यमंत्री तथा कॉंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांचे चिरंजीव व प्रभाग क्रमांक १९ मधील नगरसेवक अविनाश रमेश बागवे यांचे पुण्यातील न्यायालयाने पद रद्द केले आहे. पद रद्द झाल्याने खळबळ उडाली आहे. पुणे महानगरपालिका २०१७ च्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये प्रभाग क्र. १९ अ” मधून एकूण ८ उमेदवार निवडणूक लढवित होते.

सदरचा प्रभाग हा अनुसूचित जातीकरीता राखीव होता. तर निवडणूकीमध्ये उभे असलेले उमेदवार एडवोकेट भूपेन्द्र रामभाऊ शेडगे हे मनसे पक्षातर्फे अधिकृत उमेदवार म्हणून उभे होते. आणि अविनाश बागवे हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार होते.४ फेब्रुवारी २०१७ रोजी उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळी अविनाश बागवे यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये व नामनिर्देशन फॉर्ममध्ये दिलेली माहिती ही विसंगत व अपूर्ण तसेच खोटी असल्या कारणाने शेंडगे यांनी निवडणूक अधिकारी यांचेकडे रितसर हरकत उपस्थित केली होती.

परंतु त्यांची हरकत ही कोर्टाचा आदेश नाही असे कारण देवून निवडणूक अधिकारी यांनी फेटाळून लावली. त्यानंतर निवडणूक होवून त्यामध्ये अविनाश बागवे यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते.

सदरील निवडणूक प्रक्रिया व वरील अर्ज छाननीच्या वेळी घेतलेली हरकत विचारात घेण्यात आलेली नसल्यामुळे सदरबाबत भूपेंद्र शेडगे यांनी मुख्य लघुवाद न्यायालय, पुणे येथे निवडणूक याचिका क्रमांक ५/२०१७ ही दाखल केली होती.

निवडणूक याचिकेमध्ये झालेल्या साक्षी, तपासणी, उलटपासणी, पुरावे व दाखल कागदपत्रे या सर्व बाबींचा विचार करून तसेच कायदयाचे तरतुदींचे विचार करता न्यायालयाने २९ जून २०२१

रोजी आदेश पारीत करून अविनाश रमेश बागवे यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे १९६९ चे कलम १०(१) (डी) अन्वये अपात्र ठरवून त्यांचे नगरसेवक पद हे रद्द केलेले असल्याचे एडवोकेट भुपेंद्र शेडगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

सदरील प्रकरणात ऍड. नरेश गायकवाड, ऍड. रफिक शेख, योगेश डावरे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: