Thursday, September 3, 2026
Latest NewsPUNE

वृक्षारोपणाद्वारे भविष्यासाठी ऑक्सिजन बँक निर्माण करणे गरजेचे –  आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : कोविडच्या दुसऱ्या लाटेत आपल्याला मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची आवश्यकता भासली त्यामुळे  वृक्षारोपणाद्वारे भविष्यासाठी ऑक्सिजन बँक निर्माण करणे गरजेचे आहे, असे मत शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केले.

जनसंघांचे संस्थापक डॉ. शामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिना निमित्त आयोजित सेवा सप्ताहा अंतर्गत भाजप शहर चिटणीस सुनील माने यांनी खडकी स्टेशन येथील माऊंट व्हर्ट सोसायटी मध्ये वृक्षारोपण मोहीम आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.  

या कार्यक्रमाला सुप्रिया खैरनार, सोनाली भोसले,अनिल भिसे, गणेश नाईकरे, आनंद छाजेड, जय जोशी, रोहीत भिसे, संकेत कांबळे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार शिरोळे म्हणाले, जनसंघाचे संस्थापक डॉ. शामा प्रसाद मुखर्जी हे एक अलौकिक व्यक्तिमत्व होते. एक विचारवंत आणि प्रखर शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची कामगिरी आणि कीर्ती फार मोठी होती. याचबरोबर ते एक प्रखर क्रांतिकारी होते तसेच खऱ्या अर्थाने ते मानवतेचे उपासक होते. लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. देशाला सशक्त आणि उत्तम राजकीय पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने त्यांनी जनसंघांची स्थापना केली. म्हणूनच अशा या महान नेत्याच्या स्मृतीप्रित्यर्थ सेवा सप्ताह साजरा केला जात आहे. या सेवा सप्ताह उपक्रमा अंतर्गत आज सुनील माने यांनी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन केले आहे. 

यावेळी बोलताना सुनील माने म्हणाले, झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन बाहेर सोडततात यामुळे वातावरण स्वच्छ होते. त्याचप्रमाणे वृक्ष माणसांमध्ये आनंद आणि उत्साहाची भावना निर्माण करतात. इमारत आणि घराच्या आजूबाजूला लावलेल्या झाडांमुळे वातानुकूलित उपकरणांचा खर्च जवळपास ५० टक्क्यांनी कमी होतो. म्हणजेच झाडे ऊर्जा आणि पैसा दोन्हींची बचत करतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading